Friday, 19 September 2014

ICT INFORMATION

ICT
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान :
मानवी जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने होणय्रा प्रगतीमुळे माहिती चा वेगही वाढला आहे . माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काळाची गरज बनले आहे .
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान महत्व :
1)      विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगतीमुळे ज्ञानाचा खजिना खुला झाला आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ICT चा प्रभाव दिसुन येत आहे. ICT मुळे माहिती सहजगत्या उपलब्ध होत आहे. लक्षावधी संकेतस्थळावर हजारो संदर्भ सर्च इंजिंनच्या माध्यमातुन उपलब्ध आहे.
2)      अध्ययन – अध्यापन प्रक्रियेतील कुठ्ल्याही घटकाचे संदर्भ आणि माहिती , माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज उपलब्ध होते .
3)      मागणी आणि प्रतिसाद या तत्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते .त्यामुळे शासन , खाजगी उद्योगधधंदे , संस्थासुद्धा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतात. उदा. शिक्षण , प्रवास , अर्थ इ.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या व्याख्या :
1)      माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती प्रसारीत करणे , साठवणे , तयार करणे , माहितीचे आदानप्रदान करणे या साठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान . उदा. रेडिओ , संगणकाचे जाळे .
2)      माहितिच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी लागणार्‍या हार्डवेअर आणि सॉफ्ट्वेअरचा वापर म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान होय.
थोडक्यात ICT चे पुढील सहा घटक पडतात .
युजर , संप्रषेण , माहिती , कृती , हार्ड्वेअर , सॉफ्टवेअर इ .


माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कार्ये :
1)      समाजा आणि देश यांचा विकास घडवणे.
2)      व्यक्ती व समाज यांचे ज्ञान , त्यांची तार्किक कौशल्ये आणि दृष्टिकोन यात इलेक्ट्रानिक माध्यामांच्या मदतींने बदल घड्वणे
3)      माहितीवर पुंनप्रक्रिया करणे .
4)      माहिती समजण्यास सोपी व्हावी अशा नव्या रुपात तिचे रुपांतर करणे .
5)      कच्चा स्वरुपातील माहितीवर प्रक्रिया करुन तिचे उपयुक्त माहितीमध्ये रुपांतर करणे .
6)      माहितीचे ज्ञानामध्ये रुपांतर करणे आणि या ज्ञानाच्या माध्यमातुन वापरर्कत्याला सुजाण बनवणे .
माहितीच्या माहामार्गची ओळख :
इंटरनेट म्हणजे आधुनिक जगतील माहितीचा महमार्गच आहे . इंटरनेटच्या माध्यमातुन माहितीचा खजिना आपल्याला घरपोच मिळतो.
इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रना , केबल टेलिव्हिजन यंत्रना आणि उपग्रहाद्वारे होणारे संदेशवहन या सगळ्याचां समावेश वैश्विक माहिती आणि संप्रषेण यंत्रणेमध्ये होतो. टेलिकम्युनिकेशन नेटवर्क चे उद. इंटरनेट , बुलेटिन बोर्ड , ऑनलाईन सेवा इ. सेवा उपलब्ध असतात. पारंपारीक माहामार्गाप्रमाणे माहितीच्या माहामार्गावरही शासनाचे नियंत्रन असते.छोट्या छोट्या पॅकेटस मध्ये माहिती विभागली जाते आणि मेल आणि नेटवर्कमधुन होणाय्रा संप्रेषणामध्ये ती पाठवली जाते हे पॅकेटस स्विंचिग आणि अ‍सेंब्लीच्या सुचनांनुसार चालतात.त्यांना प्रोटोकॉल असे संबोधले जाते .
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान , शिक्षण आणि विकास यांच्यासाठी ज्ञानाधिष्ठित समाज :
1)  ज्ञानाधिष्ठित समाज जिथे हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग . ज्ञानाधिष्ठित समाजातील लोक ज्ञानाची निर्मिती , देवाण घेवाण आणि वापर समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी करतात .
2)  ज्ञानाधिष्ठित समाजात माहिती सहजगत्या उपलब्ध होते आणि सामाजिक देवाण घेवाण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे नवीन मार्ग उपलब्ध होतात.
3)  ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असते . सामाजिक , आर्थिक विकासाला चालना देणारे , गती देणारेही शिक्षणच अ‍सते .
4)  ज्ञानाधिष्ठित समाजातील परिणामकारक शिक्षणामध्ये माहिती , ज्ञान आणि संसाधनाची देवाणघेवाण आवश्यक ठरते .
5)  शिक्षण आणि विकासच्या पुनर्बाधणीमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भुमिका सुविधादाता हि आहे .
6)  शिक्षण आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या घडणीमध्ये माहिती संप्रेषण


तंत्रज्ञानाची भुमिका माहिती संप्रेषण तंत्रज्ञान  साक्षरता वाढवण्याची आहे .
ज्ञानाधिष्ठित समाजाचा विकास आणि पोषणाचा आवश्यक नावीन्यता आणि शिक्षणाला उद्युक्त करणारे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
Konwledge Soociety
 
ICT
 



शिक्षण क्षेत्रात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची व्याप्ती :
1)  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातील विलक्षण प्रगतीमुळे वर्ल्ड वाईड वेब ने विद्यार्थी , शिक्षक आणि वैज्ञानिक याच्यासाठी माहितीचा खजिना अद्तावत होत आहे.
2)  व्हिडिओ व्लिप्सच्या मदतीने विद्यार्थी ,शेतकरी आणि खेळाडुना प्रशिक्षत करण्याचे उत्तम माध्यम तसेच अभ्यास क्रम ,पाठ्यपुस्तकातील माहिती, इंटरनेट वर उपल्बध आहेत.
3)  ऑन – लाईन परिक्षामुळे मानवी चुका टाळता येतात आणि मनुष्यबळ कमी लागते .
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि शिक्षकांची बदलती भुमिका :   माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात केलेला शिक्षक विद्यार्थ्याना अनुभवातुन मार्गदर्शन करु शकतो.  
1)  अध्ययनकर्ता :  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची प्रगती झपाट्याने होत आहे . अगदी थोड्या कालावधीत संग्णक क्षेत्रात नवनवीन सोयीसह नवीन हार्ड्वेअर आणि सॉफ्टवेअर्स विकसित होत आहेत. त्यामुळे अध्ययनकर्त्याने ज्ञान अद्यावत ठेवणे आवश्यक आहे .
2)  नियोजन : अचुक नियोजन आणि कार्यवाही असेल तरच संगणकाचा जास्तीत जास्त वापर आणि फायदा करुन घेता येऊ शकतो .
3)  अ‍ध्यापन : संगणकाच्या मदतीने केलेले अध्यापन खुप महत्त्वाचे असते. परिणामकारक अध्यायनासाठी प्रत्येक विद्यार्थी शक्य तेवढे संगणक सॉफ्टवेअर्स वापरले पाहिजे.
4)  परीक्षक  : शिक्षणातील महत्वाचा भाग म्हणजे परिक्षा .  
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि आवश्यक आव्हानात्मक कौशल्ये :
पारंपरीक पद्धतीने शिकवुन माहिती साक्षरता , द्रृश्य साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता पुरवणे , त्याचप्रमाणे आजची साधने वापरुन अर्थपुर्ण पाठ्यांश कसा तयार करायचा ह्या गरजा व हे प्रश्न शिक्षण व्यवस्थे समोर निर्माण झाले आहेत. म्हणुन मूल्यमापन करणे आवश्यक झाले ते पुढील प्रमाणे
मुलभुत कौशल्ये :
1)  अर्थशास्त्रीय बदलांची जाणीव.
2)  संगणक हाताळणी
3)  वाचनाची गरज
4)  गणितीय ज्ञान इ.
प्रगत कौशल्ये शिकवणे :कुशल विचारशक्ती म्हणजे बीजगणिताप्रमाणे विशिष्ठ नियामंवर आधारीत ज्यांची उत्तरे/ मिळविता येत नाहीत अशा समस्यांवर उत्तरे शोधण्याची क्षमता .
व्लिष्ठ / गुंतांगुतीची कौशल्ये  :
1)  इंटरनेट द्वारे योग्य माहिती मिळवणे
2)  E – based अध्ययन करणे
माहिती संप्रषेण तंत्रज्ञानच्या प्रभावाने घडुन आलेले बदल :
कधीही आणि कुठेही असणाय्रा विद्यार्थ्यापर्यत पोहोचण्याची क्षमता माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आहे . या क्षमतेमुळे पारंमपारीक शिक्षणाच्या प्रारुपात क्रांतिकारी बदल आहेत.
1)  बौद्धिक ज्ञान वाढ होणे : माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे वर्गातील अध्ययनाचा वेळ कमी करता येतो. कृती ते शाळेतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेत किंवा काही वेळा गणित , विज्ञानसारखे विषय शिकवायला तज्ज्ञ शिक्षकांची नेमणुक करणे शक्य नसते अशा ठिकणी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अभ्यासक्रम शिकवले जाऊ शकतात त्यामुळे शिक्षकांना पुरक ज्ञान देण्यास वेळ मिळतो व बौद्धिक वाढ होते.
2)  इंटरनेट : ICT मुळे एकच “ शिक्षक “ अनेक शाळामध्ये शिकवु शकतो किंवा शेकडो मैल  अंतरावर राहाणारे तज्ञ शिक्षकही ऑनलाईन तसेच शासनाची कार्यपद्धती व्हिडिओ कॉन्फरंसिंगमुळे बदलत आहे .
3)  स्वत:च्या वेळेनुसार व गतीनुसार सरावावर आधारित कौशल्ये शिकु शकतात
4)  विद्यार्थी मिळवलेली माहिती वापरुन समस्या सोडवु शकतात , नवीन समस्यांना सामोरे जाऊ शकतात
5)  जगाला वर्गात आणण्याचे कमी खर्चिक आणि काही बाबतीत एकमेव माध्यम म्हणुन माहिती संप्रेषण तंत्रज्ञान कामा करते.